Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

श्री विठ्ठलसाई कारखान्याचे हंगाम २०२१-२२ करीता रोलर पुजन संपन्न

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना लि. या कारखान्याचा गळीत हंगाम २०२१-२२ साठी रोलर पुजनाचा व हायड्रोलिक ट्रिपलर बांधकामाचे भुमीपूजन कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. येत्या हंगामात कारखान्याचे ५ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून सदर हंगामासाठी लागणाऱ्या तोडणी वाहतूक यंत्रणेची भरती करण्यात आली आहे. तसेच मशिनरी ओव्हरहॉलींग, दुरुस्तीची कामे युध्द पातळीवर चालु आहेत. अनेक अडथळयावर मात करत कारखान्याची यशस्वी वाटचाल चालु असुन येणारा गळीत हंगाम योग्य व नियोजनबध्द पध्दतीने सर्व संचालक मंडळ व आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडेल अशी खात्री कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील यांनी व्यक्त केली.\"\"या कार्यक्रमास उस्मानाबाद जिल्हा बँकेचे माजी चेअरमन बापुराव पाटील, जि प चे विरोधी पक्षनेते शरण पाटील, कारखान्याचे व्हा. चेअरमन सादिकमिया काझी, उमरगा जनता बँकेचे चेअरमन रामकृष्णपंत खरोसेकर, कारखान्याचे संचालक शरणप्पा पत्रिके, केशव पवार, विठ्ठलराव बदोले, विठ्ठलराव पाटील, दिलीप भालेराव, शिवलिंग माळी, माणिक राठोड, राजु हेबळे, सुभाष पाटील व सर्व संचालक मंडळ, उमरगा पंचायत समिती सभापती सचिन पाटील, जि. प. चे माजी सदस्य गुंडाप्पा भुजबळ, ऊस उत्पादक शेतकरी, तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.बी. अथणी, चिफ इंजिनियर ए. एल. अष्टेकर, चिफ केमीस्ट एस.बी. गायकवाड, मुख्य शेतकी अधिकारी ए.बी. राखेलकर, कार्यालय अधिक्षक के.एम. चौगुले, सर्व अधिकारी, कामगार, कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

लोहारा तालुक्यातील अपघाती वळण असलेल्या ठिकाणी तात्काळ फलक लावण्यात यावेत – संभाजी ब्रिगेडची निवेदनाद्वारे मागणी

Next Post

लोहारा येथे रानभाजी महोत्सव संपन्न

Related Posts

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

Next Post

लोहारा येथे रानभाजी महोत्सव संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!