Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

व्हाटस्अ‍ॅपकडून नवीन फिचर्स सादर, युजर्सचा होणार मोठा फायदा….

by admin
in देश विदेश
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
व्हाट्सअ‍ॅपकडून आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फिचर्स सादर केली जातात. व्हाट्स अ‍ॅपची मालकी असलेल्या \’मेटा\’ कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी नुकतीच नव्या फिचर्सची घोषणा केली.

व्हॉट्स अ‍ॅप\’मधील नवीन फीचर्स
मार्क झुकरबर्ग यांनी जाहीर केल्यानुसार, व्हाॅट्स अ‍ॅपच्या एका ग्रुपमध्ये आता तब्बल 1024 सदस्य जोडता येणार आहेत. तसेच, व्हॉट्स अ‍ॅपच्या व्हिडिओ कॉलवर आता एकाच वेळी 32 जणांना सहभागी होता येणार आहे. आतापर्यंत फक्त 8 जणांना काॅलमध्ये सहभागी होता येत होते.

व्हाट्स अ‍ॅपवर आता युजर्संना 2 जीबीपर्यंत फोटो, व्हिडिओ आणि डॉक्युमेंट्स शेअर करता येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. तसेच व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमध्ये \’इन-चॅट पोल\’देखील घेता येणार आहे. या फीचरच्या माध्यमातून ग्रुपमधील सदस्य एखाद्या प्रश्नावर आपले मत नोंदवू शकतात. व्हॉट्स अ‍ॅपचे हे फीचर कसं दिसेल, तसेच त्याच्या कार्यक्षमतेबाबत कंपनीने अद्याप कोणताही माहिती दिलेली नाही. मात्र, नवीन फीचर्सचा अनुभव घेण्यासाठी युजर्संना व्हॉट्स अ‍ॅप अपडेट करावं लागणार आहे.

Tags: व्हाट्सअप्प
Previous Post

सिंचन प्रकल्पातील पाणी मागणीसाठी शेतकऱ्यांनी 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सदर करावेत

Next Post

शेतातील पत्रा शेडमधील पाणबुडी विद्युत पंप व साहित्याची चोरी – लोहारा तालुक्यातील होळी येथील घटना

Related Posts

देश विदेश

फोटोग्राफर्स सक्सेस डे मध्ये एआयपीएचएचचा सन्मान; फोटोग्राफी समुदायासाठीच्या सामाजिक व मदतकार्याची दिल्लीमध्ये दखल

देश विदेश

सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला दिलेल्या स्थगितीच्या निर्णयाबद्दल लोहाऱ्यात जल्लोष

देश विदेश

माकणी येथील शिंदे दाम्पत्याची नॉर्वे येथे फेलोशिपसाठी निवड

देश विदेश

साहित्य अकादमीचे ‘युवा’ आणि ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर – मराठी भाषेसाठी ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ यास ‘युवा’ साहित्य अकादमी तर ‘छंद देई आनंद’ या कविता संग्रहास ‘बाल’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

देश विदेश

प्रजासत्ताक दिनी राजधानीतील कर्तव्यपथावर दिसणार “साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ि” वर आधारीत महाराष्ट्राचा चित्ररथ

देश विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा यांचे निधन

Next Post

शेतातील पत्रा शेडमधील पाणबुडी विद्युत पंप व साहित्याची चोरी - लोहारा तालुक्यातील होळी येथील घटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!