Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावास लवकरात लवकर मंजूरी द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रधानमंत्र्यांकडे विनंती

by admin
in महाराष्ट्र
A A
0

मुंबई :
महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानास्पद असणाऱ्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रलंबित असून त्यास लवकरात लवकर मंजूरी द्यावी, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार राज्य शासनाने दि. १६ नोव्हेंबर २०१३ रोजी केंद्र शासनाला सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून आवश्यक त्या निकषांची पूर्तता करीत असल्याचा निष्कर्ष या तज्ज्ञ समितीने काढला असून त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे.

यासंदर्भात राज्यातील मराठी भाषिक नागरिकांनी यासंदर्भात सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहिमेंतर्गत सुमारे १ लाख २० हजारांहून अधिक पत्र राष्ट्रपतींना पाठविले आहेत. महाराष्ट्राच्या खासदारांनी वेळोवेळी याविषयी संसदेत प्रश्न उपस्थित केल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मराठीला अभिजात दर्जा देण्याचा प्रस्ताव सांस्कृतिक मंत्रालयाच्या विचाराधीन असल्याचे, केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. जी. किशन रेड्डी यांनी ३ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यसभेत सांगितले आहे. हा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे बऱ्याच कालवधीपासून प्रलंबीत असून त्याला लवकरात लवकर मंजुरी मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

Tags: अभिजात भाषेचा दर्जामराठी भाषामुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Previous Post

उमरगा तहसीलदार राहुल पाटील एसीबीच्या जाळ्यात ! २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक

Next Post

सामाजिक ऐक्य पंधरवडा अंतर्गत लोहारा येथील महाविद्यालयात ॲड. शीतल चव्हाण यांचे व्याख्यान

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Next Post

सामाजिक ऐक्य पंधरवडा अंतर्गत लोहारा येथील महाविद्यालयात ॲड. शीतल चव्हाण यांचे व्याख्यान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!