Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

मुंबईतील हॉस्पिटलमधून थेट शिर्डी येथील शिबिरात – खा. शरद पवारांनी केले शिबिरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

by admin
in महाराष्ट्र, राजकीय
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथील \’राष्ट्रवादी मंथन-वेध भविष्याचा\’ या शिबिरास राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित राहून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना या शिबिराच्या माध्यमातून एक वैचारिक शक्ती देण्याचे काम केले. राज्यभरातून युवक, महिला तसेच सामाजातील लहान घटकांमध्ये काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या शिबिरामध्ये यायची इच्छा होती. परंतु त्यांच्यासाठी स्वतंत्र्य शिबिर घेण्याचा निर्णय जयंतराव पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला आहे. मला खात्री आहे की, तो उपक्रम देखील यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास खा. शरद पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

\"\"

पुढे बोलताना देशातील व राज्यातील सध्य परिस्थितीबाबात शरद पवार साहेबांनी अत्यंत मार्मिक भाष्य केले. ते म्हणाले की, प्रधानमंत्री पदावरील व्यक्तीकडे अशी सर्वसमावेशक विकासाची दृष्टी आणि विचारांची व्यापकता असावयास हवी. परंतु दुर्दैवाने सध्या तसे दिसत नाही. एका राज्यातील प्रकल्प दूसऱ्या राज्याकडे घालवण्यात येत आहेत. वेदांता-फॉक्सकॉन नंतर टाटा-एअरबस सारखा भव्य प्रकल्प राज्यातून गुजरातकडे वळवण्यात आला. राज्यातील सध्याच्या सरकारच्या डोळयादेखत हे प्रकल्प गेले ही लाजीरवाणी गोष्ट आहे.

राज्यातील आणि देशातील नेतृत्वाने यापासून बोध घ्यायला हवा की विकास घडवायचा असेल तर मर्यादीत विचार करायचा नसतो. देशातील महिला, कष्टकरी, शेतकरी, कामगार, आदिवासी, मागासवर्गीय अशा सगळ्या घटकांमध्ये देशाला समृद्ध करण्याची धमक आहे. मात्र त्यांना प्रोत्साहित करणारे सत्ता, धर्म, जात, पक्ष यांच्या पलिकडे जाऊन विचार करणारे नेतृत्व हवे. अशी विशालदृष्टी देशातील आणि राज्यातील नेतृत्वांमध्ये नाही.

\"\"

महाराष्ट्रापूरता विचार करावयाचा झाल्यास सध्याचे राज्यकर्ते कुठे आहेत आणि काय करतायेत असा प्रश्न पडतो. सध्याच्या राज्यकर्त्यांच्या अनेक प्रसंगी व अनेक गोष्टींवर होणाऱ्या प्रतिक्रिया पाहिल्या तर त्यांचा विचार संकुचित स्वरूपाचा आहे हे प्रकर्षाने दिसून येते. हे चित्र समाधानकारक नाही. सध्या राज्यात अतिवृष्टी ओला दुष्काळामुळे शेतकरी व जनता हवालदिल झाली आहे. दैनंदिन वृत्तपत्रांतून आणि माध्यमातून सातत्याने त्यांचे प्रश्न मांडले जात आहेत. पण त्या प्रश्नांकडे सध्याचे राज्यकर्ते लक्ष देत नाहीत. महाराष्ट्र राज्य हे देशाला दिशा देणारे राज्य आहे. महाराष्ट्र एक विचार, एक संस्कृती आहे. परंतु संकुचित विचारांचे राज्यकर्ते सत्तेवर आल्यावर राज्य अधोगतीला जाऊ शकते. परंतु काही झाले तरी तसे होऊ द्यायचे नाही हे आपणासमोर आव्हान आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकर विचारांचा वारसा घेऊन समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी कटिबद्ध असणारा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील लहानसहान कार्यकर्ते एकसंध झाल्यानंतर देशातील सांप्रदायिक विद्वेशाचे चित्र बदलू शकते. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून पुरोगामी विचाराची पेरणी करून नवीन युवा पिढी तयार करणे व त्यातून एक मजबूत व विधायक नेतृत्वाचा संच तयार करणे ही राष्ट्रवादी पक्षातील सहकाऱ्यांची जबाबदारी आहे. उद्या येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका आणि दोन वर्षांनी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका यात यश मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस चित्र बदलू शकते. चला तर आपण कंबर कसून कामाला लागू या ! माझे सहकार्य आणि सदिच्छा आपल्या पाठिशी आहेतच.

\"\"

शिर्डी येथे हे भव्य शिबीर आयोजित केल्याबद्दल सर्वश्री प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, अजितदादा पवार, छगन भुजबळ आदी नेते, पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे पवार साहेबांनी मनापासून कौतुक केले. ह्या विचारमंथनात सहभागी झालेला प्रत्येकजण परत जाताना नवी उर्जा घेऊन जाईल आणि परिवर्तनाच्या कार्यात झोकून देईल अशा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

——–
\’देश का नेता कैसा हो.. शरद पवार साहेब जैसा हो..\’

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी \’राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा\’ शिबिरासाठी सभागृहात प्रवेश करताच \’देश का नेता कैसा हो.. शरद पवार साहेब जैसा हो..\’ या घोषणांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले.

Tags: खासदार शरद पवार साहेबराज्यस्तरीय शिबिरराष्ट्रवादी काँग्रेसशिर्डी
Previous Post

शेतातील पत्रा शेडमधील पाणबुडी विद्युत पंप व साहित्याची चोरी – लोहारा तालुक्यातील होळी येथील घटना

Next Post

व्हाईस आँफ मिडियाच्या उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी पत्रकार निळकंठ कांबळे यांची निवड

Related Posts

राजकीय

लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

राजकीय

पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान – लोहाऱ्यात दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

राजकीय

लोहारा तालुक्यात महायुतीचे वर्चस्व; पंचायत समितीच्या आठही जागी महायुतीचे उमेदवार विजयी

निवडणूक

सर्वसामान्य जनता महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी; धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

निवडणूक

जेवळी येथे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा

Next Post

व्हाईस आँफ मिडियाच्या उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी पत्रकार निळकंठ कांबळे यांची निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!