Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

शिवसेना कुणाची ? आज होणार निवडणूक आयोगासमोर सुनावणी !

by admin
in ब्रेकिंग, महाराष्ट्र
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राज्यात सहा महिन्यांपूर्वी सत्तांतर होऊन शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आले. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील ४० आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. परंतु त्यानंतर शिंदे व ठाकरे गटाकडून आमचीच शिवसेना खरी आहे असे सांगण्यात आले. त्यामुळे हा वाद निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयात गेला आहे.
शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कुणाला मिळणार याबाबत आज मंगळवारी १७ जानेवारी दुपारी चार वाजता निवडणूक आयोगामध्ये सुनावणी होणार आहे. पक्ष चिन्हाच्या हक्काबाबत १२ डिसेंबर २०२२ रोजी नवी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी घेण्यात आली होती. त्याला ठाकरे आणि शिंदे गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रकरणावर पुढील सोनवणे आज १७ जानेवारीला दुपारी चार वाजता होणार आहे. शिवसेनेचे नाव आणि पक्ष चिन्ह कोणाला मिळणार याचा फैसला या सुनावणीत होणार आहे. त्यामुळे पक्षाचे नाव व चिन्ह कोणाला मिळणार, निवडणूक आयोग काय निकाल देणार याकडे राज्यातील संपूर्ण राजकीय विश्वाचे लक्ष लागले आहे.

Tags: निवडणूक आयोगशिवसेना
Previous Post

शिक्षणाशिवाय समाजाचे परिवर्तन अशक्य – डॉ. प्रतापसिंग राजपूत

Next Post

भातागळी येथे भानुदासराव चव्हाण महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराला सुरुवात

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Next Post

भातागळी येथे भानुदासराव चव्हाण महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराला सुरुवात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!