जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे हे बुधवारी (दि.२८) लोहारा तालुकाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालयास भेटी देऊन पाहणी केली. तसेच घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना भेट देऊन विचारणा केली.
जिल्हाधिकारी सचिन ओंबासे हे बुधवारी लोहारा तालुका दौऱ्यावर आले होते. दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्राहक सेवा केंद्र, तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालयास भेटी दिल्या. तसेच तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय येथे भेटी देवुन ग्रामसेवक, संरपंच, लाभार्थीं यांच्या अडचणी जाणुन घेवुन यामधे भुकंप पुनर्वसन भागातील अडचणींच्या व इतर प्रश्नावर चर्चा करुन त्यावर सुलभ उपाययोजना करण्याचे सर्व उपस्थित अधिकारी यांना आदेशीत केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, प्रकल्प अधिकारी प्रांजल शिंदे, उपविभागीय अधिकारी गणेश पवार, गटविकास अधिकारी शितल खिंडे, प्रभारी तहसीलदार सुजाता हंकारे, प्रभारी नायब तहसीलदार माधव जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रहीम शेख, गटशिक्षणाधिकारी रंजना मैंदर्गी, महसूल सहाय्यक भागवत गायकवाड, अव्वल कारकून प्रवीण माटे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.