काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. बुधवारी (दि.७) ढोकी येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, माजी खासदार रविंद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले आदींची प्रमुख उपस्थिती होती. तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.