Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

जेवळी येथील गुरू सिद्धेश्वर विरक्त मठात दिपोत्सव साजरा

admin by admin
09/11/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

जेवळी :
लोहारा तालुक्यातील जेवळी येथील भाविक भक्तांचे। श्रद्धास्थान असलेल्या श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कार्तिकमास दीपोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी हजारो दीप प्रज्वलित केल्याने गुरु सिद्धेश्वर विरक्त मठ लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले होते.
कार्तिक मास निमित्त जेवळी येथील श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठामध्ये कार्तिक दीपोत्सवाचे आयोजन सोमवारी (दि.७) करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजता मठात सामूहिक भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर साडेसहा वाजता मनिप्र गंगाधर महास्वामीजीच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील यांच्या हस्ते विरक्तमठामधील श्री वीरभद्रेश्वर मंदिरात महामंगल आरती करण्यात आली. यावेळी माजी सभापती सचिन पाटील, विठ्ठलसाई कारखान्याचे संचालक दिलीप भालेराव, उमरगा जनता बँकेचे व्यवस्थापक शिवानंद चवले उपस्थित होते.


श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठाचे मठाधीश मनिप्र गुरु गंगाधर महास्वामीजी यांच्या हस्ते नवीन मठामध्ये दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित भाविक भक्तांनी संपूर्ण नवीन व जुन्या मठात दीप लावले. लक्ष लक्ष दिव्यानी संपूर्ण श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठ उजळून निघाले होते. श्री बसवेश्वर मंदिरात गावातील भक्त शिवाप्पा कारभारी व कल्याणी कारभारी यांनी मंदिरात दीप प्रज्वलन केले.


या सामूहिक दीप सोहळा कार्यक्रमासाठी उपसरपंच मल्लिनाथ डिग्गे, अभियंता राजू माळी, सुभाष चटगे, शिवराम हावळे, शरणप्पा श्रीशैल कारभारी विलास हावळे, संजय तांबडे,सिद्राम भुसाप्पा, सत्तेश्वर कारभारी, गौरीशंकर पनुरे, अप्पू तांबडे, योगिराज सोळसे, रोहित कारभारी, आकाश पाटील, श्रीकांत वलदोडे, बसवराज कारभारी, चैतन्य शिंदे, रोहित खडके, राजू स्वामी, वैभव पवार, यांच्यासह गावातील भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: दिपोत्सव
Previous Post

लोहारा येथील बालाजी स्टील & इलेक्ट्रॉनिक्सच्या दसरा, दिवाळी लकी ड्रॉची सोडत संपन्न

Next Post

लोकमंगल कारखान्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनास भूकंपग्रस्त कृती समितीचा जाहीर पाठिंबा – लोहारा तहसिलदार यांना दिले निवेदन

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

लोकमंगल कारखान्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनास भूकंपग्रस्त कृती समितीचा जाहीर पाठिंबा - लोहारा तहसिलदार यांना दिले निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's