पीकविमा तक्रार नोंदवताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी, कशा प्रकारे आणि कुठे तक्रार नोंदवावी याबाबत लोहारा तालुका कृषी विभागाने शेतकऱ्यांना माहिती उपलब्ध करून दिली आहे.
पिकविमा तक्रार नोंदवत असताना खालील मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत
1.सर्वप्रथम पिकविमा भरल्यानुसार ई पीक पाहणी अँप मध्ये ई पीक पाहणी करून घ्यावी.
ई पीक पाहणी लिंक 👇🏻👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova
2.ई पीक पाहणी अँप मध्ये नोंद केल्यानंतर पीक नुकसानीची तक्रार नोंदविण्यासाठी खालील पैकी कुठल्याही एका पर्यायाचा अवलंब करून आपली तक्रार नोंदवावी.
i) Crop Insurance App
लिंक👇🏻👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central
ii). टोल फ्री *क्रमांक:1800116515
iii).मेल आय डी:
*fasalbima@aicofindia.com*
तक्रार नोंदवीत असताना घ्यावयाची काळजी
# तक्रार शक्यतो 72 तासाच्या आत नोंदवावी.
# एका व्यक्तीच्या नावे जर एक पेक्ष्या अधिक सर्वे क्रमांक असतील तर प्रत्येक सर्वे क्रमांकाची तक्रार नोंद झाल्याची खात्री करावी.
तालुका कृषी अधिकारी, लोहारा