वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील ज्येष्ठ नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ते कृष्णाथ साठे (७५ वर्षे ) यांचे गुरुवारी (दि. १६) सायंकाळी पाचच्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर माकणी येथील स्मशानभूमीत शुक्रवारी (दि.१७) सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सुन व नातवंडे असा परिवार आहे.