वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथे तुळजापूर नवरात्र उत्सवासाठी पाय चालत जाणाऱ्या भाविक भक्तांना प्रथमोपचार मिळावा यासाठी माकणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्राम पंचायत माकणी यांच्या वतीने शनिवारी (दि.२४) प्रथमोपचार केंद्र सुरु करण्यात आले. यावेळी तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पूजन ग्रा.प. चे माजी सदस्य फुलचंद आळंगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच विठ्ठल साठे, माजी उपसरपंच दादासाहेब मुळे, ग्राम.प.सदस्य बाळू कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पी.एस.शिंदे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी किशोर जाधव, युवराज गायकवाड, सगर, डिगुले, मठपती, घंटे मॅडम यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचारी व ग्राम.प.चे कर्मचारी रणजीत साठे, सुर्यवंशी महादेव व गावातील नागरिक उपस्थित होते.