वार्तादूत – डिजिटल न्यूज नेटवर्क
लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये ग्रामीण रुग्णालय लोहाराचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गोविंद साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि. १०) राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शहाजी जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जंत नियंत्रणाच्या गोळीबरोबर जंतपासून बचावासाठी सर्वांनी नियमित नखे कापावी, नेहमी स्वच्छ पाणी प्यावे, खाण्याचे पदार्थ झाकून ठेवा, फळे व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवा, नेहमी पायात चप्पल व बूट घाला, उघड्यावर शौचाला बसू नये व नेहमी शौचालयाचा वापर करावा, जेवणा आधी व शौचाहून आल्यानंतर आपले हात साबणाने धुवावे अशी महत्वाची माहिती दिली. यावेळी स्कूलमधील वय वर्ष २ ते १५ पर्यंतचे एकूण २३० विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्याचे वाटप करण्यात आले. यावेळी लोहारा ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी ए. व्ही. गिराम, साळुंके यांच्यासह सविता जाधव, संचीता बाचपल्ले, महादेवी होगाडे, संतोषी घंटे, सरिता पवार, मीरा माने आदी उपस्थित होते.