Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लातूरचा विष्णू तातपुरे ठरला यावर्षीचा लोहारा केसरी – रामलिंग मुदगडचा प्रदीप गोरे उपविजेता

admin by admin
20/02/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
अतिशय अटीतटीच्या झालेल्या अंतिम कुस्तीत लातूरच्या विष्णू तातपुरे याने विजय मिळवत लोहारा केसरीचा किताब पटकाविला. तर रामलिंग मुदगड येथील प्रदीप गोरे उपविजेता ठरला. लोहारा महाशिवरात्री यात्रामहोत्सवा निमित्त शहरातील लोहारा हायस्कूलच्या प्रांगणात रविवारी (दि. २०) कुस्ती स्पर्धा पार पडल्या. यावेळी कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
महाशिवरात्री महोत्सवानिमित्त तीन दिवसापासून शहरात विविध कार्यक्रम होत आहेत. यात्रामहोत्सव समितीच्या वतीने रविवारी (दि. २०) भव्य कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. सायंकाळी पाच वाजता मान्यवरांच्या हस्ते कुस्ती आखाड्याचे पूजन झाले. यावेळी माजी सरपंच शंकर जट्टे, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, दत्ता निर्मळे, नगरसेवक विजयकुमार ढगे, गोपाळ सुतार, विठ्ठल वचने यांच्या प्रमुख उपस्थितीत कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन झाले. या कुस्तीच्या आखाड्यात तालुक्यासह इतर जिल्ह्यातील नामवंत मल्ल सहभागी झाले होते. सायंकाळी पाच वाजता सुरू झालेल्या कुस्त्या रात्री दहा वाजता संपल्या. १०० रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंतच्या कुस्त्या झाल्या. या दरम्यान लोहारा येथील सद्गुरू कुस्ती संकुलाच्या मल्लांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कुस्ती स्पर्धेदरम्यान आमदार ज्ञानराज चौगुले, पोलिस निरीक्षक अजितकुमार चिंतले, माजी नगरसेवक अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख यांच्यासह नगरसेवकांनी उपस्थिती लावली होती. यावेळी आ. चौगुले यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली.

कुस्ती
अंतिम लढतीसाठी सहा जणांची नोंदणी झाली होती. त्यामुळे लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून लॉट्स पध्दतीने कुस्त्या लावण्यात आल्या. लातूरच्या विष्णू तातपुरे व रामलिंग मुदगड येथील प्रदीप गोरे यांच्यात अंतिम कुस्ती झाली. ही कुस्ती जवळपास अर्धा तास चालली. अखेर ही कुस्ती विष्णू तातपुरे याने जिंकली. कुस्तीचा निकाल लागताच उपस्थितीतांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विष्णू तातपुरे याला लोहारा केसरी किताब व ३१ तोळे महादेवाची चांदीची पिंड देऊन गौरविण्यात आले.

उपविजेता प्रदीप गोरे याचाही सत्कार करून त्याला मानधन देण्यात आले. यावेळी शंकर जट्टे, चंद्रकांत पाटील, विठ्ठल वचने, श्रीनिवास माळी, गोपाळ सुतार, के.डी. पाटील, दत्ता निर्मळे, प्रताप घोडके, सतिश ढगे, ओम पाटील, विरेश स्वामी, भीमाशंकर डोकडे, किरण पाटील, हणमंत गरड, सुनिल देशमाने, महेश कुंभार, बबन रणशुर, अमित बोराळे, गगन माळवदकर, प्रथमेश मुळे आदींसह शहर व परिसरातील कुस्ती प्रेमी उपस्थित होते. यावेळी पंच म्हणून दयानंद साळुंके, रामेश्वर कार्ले, अरुण हावळे, हरी वाघे, मोहन वचने, गंगाराम भोंडवे यांनी काम पाहीले.

महाशिवरात्री
फोटो – दयानंद स्वामी लोहारा

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: महाशिवरात्री
Previous Post

उदगीरचा निवृत्ती गुडेवार ठरला मॅरेथॉनचा विजेता – महाशिवरात्री यात्रामहोत्सवानिमित्त लोहाऱ्यात मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

Next Post

आमदार अभिमन्यू पवार यांची सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयास भेट

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

आमदार अभिमन्यू पवार यांची सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयास भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's