वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लोहारा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात बुधवारी (दि. १७) सकाळी ११ वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन संपन्न झाले.
यावेळी तहसीलदार संतोष रुईकर, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे, नायब तहसीलदार सुजाता हंकारे, दिगंबर स्वामी, प्रभारी नायब तहसीलदार माधव जाधव, अव्वल कारकून प्रवीण माटे, बालाजी चामे, मंडळ अधिकारी बी. एस. भरनाळे, महसूल सहाय्यक भागवत गायकवाड, जि जे देवगिरे, महेश क्षीरसागर, शिवलिंग येरटे, वजीर अत्तार, शिपाई रसुल खुटेपड, वाहन चालक झाकीर औटी, कोतवाल धोंडीराम गडदे, माहेश्वरी साळुंके , मल्लीरनाथ कोळी, गायिका लक्ष्मी वाघमारे आदींसह तहसिल, पंचायत समिती कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाआधी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला. भागवत गायकवाड व गायिका लक्ष्मी वाघमारे यांनी देशभक्तीपर गीते गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.