वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील दिव्यांग सेलच्या शाखेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार व दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष प्रदीप डोके यांच्या हस्ते रविवारी (दि. १२) करण्यात आले.
तालुक्यातील माकणी येथे राष्ट्रवादी दिव्यांग सेलच्या वतीने शाखा उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माकणी येथील शाखेचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार व दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष प्रदीप डोके यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, ज्येष्ठ नेते किशोर साठे, सरपंच विठ्ठल साठे, गोविंदराव साळुंके, वसंत साखरे, गुरुलिंग वाकडे, सुधाकर आलमले, प्रताप पाटील, भागवत आलमले, विठ्ठल नरसाळे, उपसरपंच वामन भोरे, बालाजी साठे, गोविंद साठे, अॅड. दादासाहेब जानकर, प्रकाश भगत, अजित सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे लोहारा तालुकाध्यक्ष लक्ष्मण बिराजदार, जिल्हा उपाध्यक्ष शौकत अली मासुलदार, अप्पा उपरे, तालुका उपाध्यक्ष दिपक आलमले, राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे माकणी शाखा अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, उपाध्यक्ष चांद सय्यद, सचिव कमलाकर साठे, कोषाध्यक्ष बळीराजा साठे,ओंकार साठे, अच्युत चिकुंद्रे, सरदार मुजावर, गोविंद चव्हाण, बाळू कांबळे, दिपक आळंगे, तानाजी सगर, वैजीनाथ पोटरे, हरी सुर्यवंशी, विशाल शिंदे, दिलीप चौरे, मुस्तफा शेख व दिव्यांग उपस्थित होते.