Vartadoot
Friday, January 9, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा व उमरगा तालुक्यातील भूकंपग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न प्रशासनाने तातडीने सोडवावेत – राज्यमंत्री संजय बनसोडे – उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न – लोहारा व उमरगा तालुक्यातील भूकंपग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा

admin by admin
21/05/2022
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा व उमरगा तालुक्यातील भूकंपग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न प्रशासनाने तातडीने सोडवावेत असे आदेश भूकंप व पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत.
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शनिवारी (दि. २१) राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत उमरगा आणि लोहारा तालुक्यातील भूकंपग्रस्त लाभार्थ्यांना त्यांच्या हक्क देण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्यमंत्री बनसोडे बोलत होते. लोहारा व उमरगा तालुक्यातील भूकंपग्रस्तांच्या अनेक अडचणी आहेत. त्या अडचणी सोडविण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, भूकंपग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष अमर बिराजदार यांनी प्रशासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे. याबाबत मागील आठवड्यात मुंबई येथे भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांची भेट घेऊन त्यांना या प्रश्नावर उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घ्यावी अशी विनंती केली होती. त्यानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले-डंबे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेंद्रकुमार कांबळे, औसा येथील उपविभागीय अधिकारी श्री. कांबळे, माजी आमदार राहुल मोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, भूकंपग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष अमर बिराजदार, अजित जाधव, सलमान सवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कोषाध्यक्ष जगदीश पाटील, सचिन रणखांब, जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन नाडगौडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीवनराव गोरे, जि.प. माजी सदस्या सक्षणा सलगर, संजय दुधगावकर, सुनिता पावशेरे, शमशोद्दीन जमादार, रणजित गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, अमर बिराजदार यांनी लोहारा व उमरगा तालुक्यातील भूकंपग्रस्तांवर सध्या कशा पद्धतीने अन्याय होत आहे याबद्दल सविस्तर मांडणी केली. यावेळी लातूर जिल्ह्यातील भूकंपग्रस्तांना तेथील जिल्हाधिकारी कार्यालयाने निर्णय घेऊन न्याय दिला असताना त्याच धर्तीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील भूकंपग्रस्तांबद्दल निर्णय का घेतला जात नाही असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, भूकंपग्रस्तांचे प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी त्या-त्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे आहे. उमरगा आणि लोहारा तालुक्यातील मयत झालेल्या भूकंपग्रस्तांच्या पाल्यांना किंवा वारसांना ही प्रमाणपत्र मिळत नाहीत, अशा तक्रारी आहेत. तेंव्हा संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी अशा प्रत्येक प्रकरणात लक्ष घालून पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वेळेत द्यावेत, याबाबत लातूर जिल्ह्यात अडचणी येत नाहीत. तेथे अशी प्रमाणपत्र नियमित दिली जातात तर उस्मानाबाद जिल्ह्यातही विना तक्रार अशी प्रमाणपत्र देण्यात यावीत, असेही आदेश श्री.बनसोडे यांनी यावेळी दिले. उमरगा व लोहारा तालुक्यातील भूकंपग्रस्त गावातील रस्त्यांची कामे जिल्हा वार्षिक योजनेतून टप्प्या टप्प्याने करण्यात येत आहेत. 2019-20 मध्ये 30 गावातील 20 किमीचे रस्त्यांचे पाच कोटी रुपये खर्च करुन कामे केली आहेत. 2020 ते आजपर्यंत 20 रस्त्यांचे काम दोन कोटी 22 लाख रुपये खर्च करुन करण्यात आली आहेत. या गावांतील रस्त्यांच्या कामासाठी एकदाच निधी उपलब्ध करुन दिल्यास ही कामे कालमर्यादेत पूर्ण करता येतील तेंव्हा यासाठी एकत्रित निधी राज्य शासनाने उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचे श्री. राहुल गुप्ता म्हणाले. या रस्त्यांची कामे मातोश्री शेत व पाणंद रस्ते, शरद पवार ग्रामीण रस्ते योजना आणि महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून करण्याबाबत प्रशासनाने विचार करावा, ही कामे विहित नियमाप्रमाणे केल्यास तक्रारीही होत नाहीत. पण तक्रारी होतात म्हणून अधिकारी या योजनेत त्यातही मग्रारोहयो मध्ये कामे करत नाहीत, ही बाब योग्य नाही असे मतही राज्यमंत्री बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केले.ज्या शेतकऱ्यांनी भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी स्वत:च्या जमिनी दिल्या त्यांचे पाल्य किंवा वारस यांना नौकऱ्या नसल्याने ते बेरोजगार आहेत. त्यांना त्या-त्या गावाच्या शेजारून जाणाऱ्या राज्य महामार्गाच्या लगत व्यवसाय करण्यासाठी जागा देण्यात याव्यात, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर निर्णय घेण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश राज्यमंत्री श्री.बनसोडे यांनी यावेळी दिले. शासकीय नौकऱ्यात भूकंपग्रस्तांना प्राधान्य देण्याबाबतच्या निर्णयांची सक्षमपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असेही ते म्हणाले. काही गावांच्या पिण्याच्या पाण्याचा तर काही ठिकाणी घरांसाठी शासकीय जमीन उपलब्ध करुन देण्याचा प्रश्न आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जल जीवन मिशनच्या योजनेंतर्गत तर घरांसाठी जमिनी देण्याबाबत जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा, अडचण असेल त्या ठिकाणाचा प्रस्ताव शासनास पाठवावा, असेही आदेश यावेळी दिले. यावेळी जल जीवन मिशन आणि महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा आढावा घेण्यात आला. भूकंपग्रस्तांबद्दल जो निर्णय लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने चार वर्षांपूर्वी घेतला आहे त्याची माहिती घेऊन आपणही निर्णय घ्यावा असे आदेश यावेळी राज्यमंत्री बनसोडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे लोहारा व उमरगा तालुक्यातील भूकंपग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Tags: भूकंपग्रस्त
Previous Post

लोहारा तालुक्यात वखार महामंडळाचे गोडाऊन बांधण्यात यावे – पार्वती बागायतदार शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने भेट घेऊन केली मागणी

Next Post

शासकीय आधारभूत केंद्रावर २९ मे पर्यंत हरभरा विक्री करता येणार

Related Posts

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट

27/12/2025
गौरीशंकर कलशेट्टी यांच्या साहित्याची जिल्हास्तरासाठी निवड
लोहारा तालुका

गौरीशंकर कलशेट्टी यांच्या साहित्याची जिल्हास्तरासाठी निवड

20/12/2025
लोहारा तालुका

मल्लिकार्जुन कलशेट्टी यांची राज्यस्तरावर निवड

18/12/2025
लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी
लोहारा तालुका

लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

09/12/2025
एकोंडी (लो) येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप

08/12/2025
मार्डी जिल्हा परिषद शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा
लोहारा तालुका

मार्डी जिल्हा परिषद शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा

04/12/2025
Next Post

शासकीय आधारभूत केंद्रावर २९ मे पर्यंत हरभरा विक्री करता येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's