वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालय येथे गुरुवारी (दि.२८) विद्यार्थ्यांच्या कृतिशील सहभागाने अभ्यासक्रमातील प्रयोग प्रात्यक्षिके घेण्यात आली. याला परिसरातील शाळा व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या वतीने विज्ञानवाहिनीच्या फिरती प्रयोगशाळा उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत शाळांमध्ये प्रयोग सादरीकरण करण्यात येत आहे. यामध्ये विद्यालयातील मुख्याध्यापक, विज्ञान विषयासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. या फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून विज्ञानवाहिनीच्या प्रमुख उर्मिला परचुरे यांच्या देखरेखीखाली विवेक एरंडे, दत्तात्रय देवल, विनायक दिक्षित, यशश्री वाघ, गजानन रानडे या सर्व सेवानिवृत्त शिक्षकांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना खूप चांगले प्रयोग प्रात्यक्षिके शिकविली जात आहेत. त्याचबरोबर या फिरत्या प्रयोगशाळेच्या बसमध्ये अंधश्रद्धा, सूक्ष्मजीव, विषारी – बिनविषारी सापांबद्दलच्या चित्रफिती अतिक शेख यांनी दाखविली. हॅलो मेडिकल फाउंडेशन अणदूर, दुर्गादेवी ट्रस्ट पुणे आणि विज्ञानवाहिनी संस्था पुणे संचलित ग्रामीण विज्ञान केंद्र, अणदूरच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम घेतला जातो. प्रतिवर्षी जवळपास एक हजार पाचशे विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी होतात. हॅलोचे अध्यक्ष डॉ. शशिकांत अहंकारी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि विज्ञान संवादक प्रसन्न कंदले यांच्या नियोजनानुसार या शाळेचे मुख्याध्यापक एस.बी.भोयटे, एम. के. जाधव, बी. एस. स्वामी, जी. डी. मैंदाड, बी. जे. मनोहर, ए. व्ही. जाधव यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी एस. के. जाधव, एस. के. पांचाळ, एम. एम. प्रताप यांच्यासह पालक व ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल विज्ञानवाहिनीचे आभार मानले.