वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
विधानसभा अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके या अखेर विजयी झाल्या आहेत. बाराव्या फेरीअखेर त्यांना 45 हजार 218 मते मिळाली. त्यानंतर त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला आहे.आता विजयाची घोषणा करण्याची औपचारिकता बाकी आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर भाजपाकडून मुरजी पटेल यांच्यासह अनेकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपाच्या मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला होता. या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (दि.3) मतदान झाले होते. रविवारी (दि. 6) सकाळी मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात झाली होती. 12 व्या फेरीअखेर ऋतुजा लटके यांना 45 हजार 218 मते मिळाली. तर तेराव्या फेरीअखेर 48 हजार 15 मते मिळाली. विजयाची अधिकृत घोषणा होण्याची औपचारिक घोषणा बाकी आहे. या विजयामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मोठा जल्लोष करण्यास सुरुवात झाली आहे.