वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी वाणिज्य शखेतील विद्यार्थिनी अतिया मकबूल बागवान हिने विभागीय मैदानी स्पर्धेतील गोळाफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केळी आहे.
ही स्पर्धा क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यनाने तुजाभवानी स्टेडियम उस्मानाबाद येथे दि. ९ जानेवारी रोजी संपन्न झाल्या. यावेळी राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल अतिया मकबूल बागवानचा तर विभागीय ८०० मी. धावणे स्पर्धेत निवड झाल्याबद्दल अपर्णा सूर्यवंशी या बारावी वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनींचा महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्या उर्मिला पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. मानवी मनाला आकार देण्यासाठी क्रीडा स्पर्धातील सहभाग महत्वाचा असतो. यातूनच विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, महत्वाकांक्षा इत्यादी गुण विकसित होतात असे प्रतिपादन प्राचार्या उर्मिला पाटील यांनी केले. अतिया व अपर्णा यांच्या यशातून हायस्कूल व महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी असे उदगार उर्मिला पाटील यांनी काढले.
भारतीय राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. शेषेराव जावळे पाटील यांनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी क्रीडा विभाग प्रमुख प्रा. प्रशांत काळे, क्रीडा विभाग प्रमुख नागनाथ पांढरे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. यावेळी भास्कर जाधव, प्रा. उद्धव सोमवंशी, प्रा. सुनिल बहिरे, प्रा. विजय उंबरे, बालाजी विरोधे, प्रा. सचिन शिंदे, प्रा. ज्ञानदेव शिंदे, दत्ताजी जावळे पाटील, प्रा. लक्ष्मीकांत कुलकर्णी, प्रा. राजेश अष्टेकर, प्रा. रामचंद्र खुणे, प्रा. राजेंद्र साळुंके, काकासाहेब आनंदगावकर, अंकुश शिंदे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.