वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी मांडवा गावचे महेबुब काझी व सचिव पदी लोहारा तालुक्याचे तौफीक कमाल यांची निवड करण्यात आली आहे.
अधिवक्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि तळागाळात कार्यरत असलेल्या समाजसेवी कार्यकर्त्यांचा एक असा समूह आहे जो भारतात नागरी व मानवाधिकार संरक्षणासाठी संघर्षरत आहे. ए. पी. सी. आर. ना लाभ ना हानी तत्वानुसार चालणारी एक अशी असरकारी संस्था आहे जिला २००६ मध्ये समाजातील शोषित वंचित वर्गांच्या मानवाधिकाराच्या संरक्षणार्थ स्थापित करण्यात आले आहे.