वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीचे २५ वर्ष सरपंच पद भूषवून गावचा विकास करणारे महाराष्ट्रात एक आदर्श सरपंच म्हणून ख्याती मिळविलेले भास्करराव पेरे पाटील लोहारा तालुक्यातील सरपंचांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या हस्ते तालुक्यातील सरपंचांचा सन्मान करण्यात येणार आहे. लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी ( दि.१९) सकाळी ११ वाजता लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन सुरेशदाजी बिराजदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात कोविड १९ काळात आपल्या जीवाची बाजी लावून गाव सुरक्षित ठेवणाऱ्या सरपंचांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा विकास साधण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन भास्करराव पेरे पाटील करणार आहेत. लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी ( दि.१९) सकाळी ११ वाजता लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कु. सक्षणा सलगर, राष्ट्रवादी व्यसनमुक्ती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संदीप तांबारे, धनेश्वरी शिक्षण संस्थेचे प्रतापसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोर साठे, गटविकास अधिकारी सोपान अकेले, पोलीस निरीक्षक धरमसिंह चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नागन्ना वकील, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर कोकणे, जिल्हा कोषाध्यक्ष जगदीश पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य हाजी बाबा शेख, उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, मा. जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी, बाबासाहेब जाधव, तालुका कार्याध्यक्ष अमोल ओवांडकर, दादासाहेब जानकर, तालुका उपाध्यक्ष प्रशांत सोमवंशी, अभिजित लोभे, सलमान सवार, अजित जाधव, विठ्ठल बुरटूकणे, तालुका कोषाध्यक्ष बालाजी मेनकुदळे, युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहारा शहराध्यक्ष आयुब शेख, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष मुक्तार चाऊस, हेमंत माळवदकर, महिला तालुकाध्यक्षा शरिफा सय्यद, युवती तालुकाध्यक्षा अक्षता माळवदकर, महिला शहराध्यक्षा सुलोचना रसाळ उपस्थित राहणार आहेत.