वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
औसा तालुक्याचे आमदार मा. श्री. अभिमन्यू पवार यांनी सोमवारी (दि.२०) स्पर्श सास्तूर येथील स्पर्श रुग्णालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी जवळपास दोन तास ग्रामीण रुग्णालय स्पर्शच्या कामकाजाची आस्थेवाईकपणे पाहणी केली.
स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी आमदार पवार यांना स्पर्शच्या दैनंदिन कामकाजाची माहिती दिली. रुग्णालयाचे कामकाज येथील स्वच्छता, कर्मचाऱ्यांची रुग्णांना दिली जाणारी वागणूक व येथील शिस्त पाहून आ. अभिमन्यू पवार प्रभावीत झाले. ते म्हणाले कि, स्पर्शची ख्याती सर्वदूर पसरली आहे. स्पर्शच्या आरोग्य सेवेतील योगदानाबद्दल नेहमीच ऐकले आहे. आज प्रत्यक्ष भेट देण्याच योग आला. स्पर्श मार्फत दिल्या जाणाऱ्या दर्जेदार आरोग्य सेवेमुळे ग्रामीण भागातील जनतेसाठी त्यांच्या आरोग्याच्या निवारणासाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यामधून आरोग्य सेवेसाठी येणाऱ्या रुग्णांच्या प्रचंड प्रमाणातील ओढ्यावरूनच हे सिद्ध होते असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले कि, संपुर्ण समर्पण वृत्तीतूनच स्पर्शने आपले इतरांपेक्षा वेगळेपण सिद्ध केले आहे. त्यामुळेच या रुग्णालयाला शासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. राष्ट्रीय दर्जा गुणवत्ता मानांकन (NQAS) पुरस्कार प्राप्त लक्ष्य पुरस्कार, आरोग्य सेवेचा महाराष्ट्र शासनाचा प्रथम क्रमांकाचा दोन वेळा पुरस्कार, स्वच्छ भारत अभियानच्या कायाकल्पचा राज्यस्तरीय पुरस्कार तसेच कायाकल्प अभियानाचे दरवर्षी उतेजनार्थ परितोषिक प्राप्त करणारे हे संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव ग्रामीण रुग्णालय असावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शासनाच्या सर्वच ग्रामीण रुग्णालयांनी स्पर्शचा आदर्श घेऊन आपल्या परिसरातील गोरगरीबांना आदर्श आरोग्य सेवा द्यावी असे आबाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
लोहारा तालुका भाजपाच्या वतीने आ. अभिमन्यू पवार यांचा सत्कार
आ. अभिमन्यू पवार हे सोमवारी लोहारा तालुक्यात आले होते. यावेळी लोहारा तालुका भाजपाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार आदी उपस्थित होते.