आमदार ज्ञानराज चौगुले यांनी गुरुवारी (दि.३०) उमरगा तालुक्यातील नारंगवाडी, मातोळा, कवठा, व लोहारा तालुक्यातील एकोंडी (लो.), राजेगाव, रेबे चिंचोली, सास्तुर शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये जाऊन सोयाबीन, मूग, उडीद आदी खरीप पिकांचे व वाहून गेलेल्या जमिनीची पाहणी केली. यावेळी युवा नेते किरण गायकवाड, तहसीलदार तथा उपविभागीय अधिकारी उमरगा राहुल पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, लोहारा तहसीलदार संतोष रुईकर, जि.प. सदस्य शेखर घंटे, कृषी पर्यवेक्षक डी.एम.जाधव, लातूर पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता के.आर. येणगे, योगेश तपसाळे, शरद पवार, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख संदीप चौगुले, गोपाळ जाधव, नारंगवाडी येथील शेतकरी संजय पवार, राजेंद्र चव्हाण, कुमार पवार, भीमाशंकर माळी, मातोळा येथील सरपंच गिरी, ज्ञानेश्वर भोसले, अंबादास भोसले, कवठा येथील विकास पाटील, नितीन पाटील, ऍड.व्यंकटराव सोनवणे, व्यंकटराव मडोळे, एकोंडी लो. येथील धैर्यशील सूर्यवंशी, दत्ता जाधव, मनोज कुलकर्णी, विश्वास पाटील, मधुकर लाळे, हरी भोसले, राजेगाव येथील बालेपिर शेख, अविनाश देशमुख, अभिमन्यू देशमुख, शाहूराज देशमुख, सरपंच सुरेश देशमुख सर्व गावचे तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहाय्यक उपस्थित होते.तेरणा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे दरवर्षीच मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने नदीपात्राचे खोलीकरण व सरळीकरण करून इतर कायमस्वरूपी उपयोजना करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी यावेळी आश्वासित केले. शेतकऱ्यांना पीक नुकसानीची माहिती ऑनलाईन करण्यासाठी ग्रामपंचायत संगणक परीचालकांनी सहकार्य करावे, नदीकाठच्या शेतातील वाहून गेलेल्या मातीच्या नुकसानीचे स्वतंत्र पंचनामे करावेत, निम्न तेरणा प्रकल्पाचे अधिकारी व परिसरातील शेतकरी यांच्यात प्रकल्पातील पाणीसाठयाबाबत समन्वय रहावा यासाठी ततात्काळ बैठक आयोजित करावी, ऑनलाईन अर्ज करण्यास अडचणी येत असलेल्या शेतकऱ्यांकडून ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात यावेत असे निर्देश आमदार ज्ञानराज चौगुले यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.