वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले व युवा नेते किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुक्यातील विलासपूर पांढरी येथे जंगी कुस्ती स्पर्धा पार पडली. यात महेंद्र गायकवाड आमदार केसरी तर लोहारा तालुक्याचा सुपुत्र जीवन भुजबळ युवा केसरीचा मानकरी ठरला आहे.
लोहारा तालुका शिवसेना व युवा सेनेच्या वतीने या भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. लोहारा तालुक्यातील विलासपूर पांढरी येथे झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक नामवन्त तालमितील पैलवान सहभागी झाले होते. यात पूणे येथील काका पवार यांच्या तालमितील महेंद्र गायकवाड हा आमदार केसरी चा विजेता ठरला त्यास रोख ५१,००० रु. व चांदीचा गदा देऊन गौरविण्यात आले. तर हनुमान आखाड्यातील गणेश दांगट यांच्या तालमितील माऊली हा पठ्ठा स्पर्धेचा उपविजेता ठरला. तसेच लोहारा तालुक्याचा सुपुत्र जीवन भुजबळ हा युवा केसरी स्पर्धेचा विजेता ठरला. त्यास ३१,००० रु. रोख व चांदीचा गदा पारितोषिक म्हणून देण्यात आला. याव्यतिरिक्त इतर लहानमोठ्या एकूण ४ लक्ष रुपयांच्या रंगतदार कुस्त्या यावेळी संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उदघाटन आमदार ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरण गायकवाड यांच्या हस्ते तर बक्षिस वितरण महाराष्ट्र केसरी बाला रफी शेख व अर्जुन पुरस्कार विजेते राहुल आवारे यांच्या वडिलांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी उमरगा बाजार समितीचे सभापती मोहयोद्दीन सुलतान, शिवसेना उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, बळीराम सुरवसे, अविनाश माळी, अभिमान खराडे, श्रीकांत भरारे, सलीम शेख आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेना लोहारा तालुकाप्रमुख मोहन पनुरे, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, काकासाहेब चव्हाण, परवेज तांबोळी, नामदेव लोभे, दत्ता मोरे, नितीन जाधव, सचिन गोरे आदींनी परिश्रम घेतले.