वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत निलंगा तालुक्यात कार्यरत सर्व समुदाय संसाधन महिला व कर्मचारी यांचे वतीने निलंगा तालुका आमदार व राज्याचे माझी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना मंगळवारी (दि.१३) विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी निवेदनातील विविध मागण्या संदर्भात उपस्थित महिला व कर्मचारी यांच्या सोबत सकारात्मक व सविस्तर चर्चा करून महिलांना आश्वासित केले.
यावेळी उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना जिल्हा अध्यक्षा अलका लोखंडे, तालुका अध्यक्षा पल्लवी गायकवाड, तालुका संघटक पूजा थोटे, सदस्य नितीन रोडे, प्रभाग महिला प्रतिनिधी ज्योती माने, आशा तीप्पनबोने, अनुराधा वाडीकर, ज्योती बाकले, माधुरी दडपे, सरस्वती सारवडे, उषा पांडे, महानंदा क्षीरसागर, जिल्हा कार्यकारणी सदस्य नितीन रोडे, तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश, तालुका व्यवस्थापक शरद समुखराव, प्रभाग समन्वयक लिंबराज कुंभार हे उपस्थित होते. सदर निवेदनावर एकूण 82 समूह संसाधन महिला व कर्मचारी यांच्या स्वाक्षरी आहेत.