वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्ह्यात सर्व साखर कारखान्यात कामाला आलेल्या उसतोड मजूरांना कारखान्याचे ठिकाणी रेशन धान्य वितरीत करण्याबाबत उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे.
त्यानुसार शनिवारी (दि.१९) लोहारा तालुक्यातील लोकमंगल माउली साखर कारखान्याचे ठिकाणी विविध जिल्हयातून परराज्यातून आलेल्या उसतोड मजुरांना स्वस्त धान्य वितरणासाठी सुरुवात करण्यात आली. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पोर्टबिलिटीद्वारे धान्य वाटप केले जात आहे. सदर वाटप कारखान्याच्या ठिकाणी हंगाम संपेपर्यंत सुरु राहणार आहे. यामुळे परजिल्हयातील, परराज्यातील उसतोड मजुरांची कामासाठी स्थलांतरामुळे रेशन अभावी होणारी अडचण दूर होणार आहे. कारखाना स्थळी शासकीय स्वस्त उपलब्ध होत असल्याने उसतोड मजुरांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
शनिवारी (दि. १९) धान्य वितरण सुरुवात करण्यात आली. यावेळी लोहारा तहसीलदार संतोष रुईकर, लोकमंगल माउली साखर कारखान्याचे कार्यकारी अधिकारी श्री. वाघोलीकर, प्रशांत पाटील, शेतकी अधिकारी कुलकर्णी, नायब तहसीलदार महादेव जाधव, शासकीय स्वस्त धान्य दुकानदार दिलीप जाधव, इनुस पटेल, गुरुनाथ पाटील, कारखान्यातील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, मुकादम, उसतोड कामगार उपस्थित होते.