एमसीईडी लातूर व उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु. येथे बुधवारी (दि. 3) शासकीय योजनांची जत्रा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु. येथे MCED लातूर व उमेद अभियान निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय योजनांची जत्रा या कार्यक्रमा अंतर्गत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात उपस्थित बचत गटाच्या महिलाना MCED कार्यक्रम समन्वयक दीपक गायकवाड यांनी CMEGP, PMEGP या योजनेविषयी पात्रता, निकष, प्रस्ताव सादर करण्याची पद्धती तसेच योजनेमध्ये समाविष्ट उत्पादन व सेवा उद्योग याविषयी सविस्तर माहिती देऊन जास्तीत जास्त पात्र महिलांनी प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन केले. यावेळी जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेश भगवान कोरे यांनी आर्थिक साक्षरता ही काळाची गरज असून महिलांनी डिजिटल व कॅशलेस बँकेचे व्यवहार करून बँकेच्या सामाजिक सुरक्षा योजनेचा सर्वांनी लाभ घेऊन आपले जीवन सुरक्षित करावे असे प्रतिपादन केले.
प्रसंगी उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी महिलांनी बँकेच्या कर्जाचा तसेच शासकीय योजनेतून मिळणाऱ्या निधीचा चांगला विनियोग करून आपल्या आर्थिक उत्पन्नात वाढ करावी तसेच प्राप्त निधीच्या लेखा विषयक बाबी अद्यावत ठेऊन गट, ग्रामसंघ व प्रभागसंघ या संस्था बळकट कराव्यात असे सर्व महिलाना संबोधित केले. यावेळी MCED उद्योग निरीक्षण सुनील जाधव यांनी महिलाना मार्गदर्शन केले. मेळाव्याचे प्रास्ताविक तालुका अभियाना व्यवस्थापक भगवान अंकुश यांनी केले. सूत्र संचालन सुनील मांधले यांनी केले. या मेळाव्याचे यशस्वी नियोजन प्रभाग समन्वयक गोविंद रावते, त्रिंबक लहाने यांनी केले. मेळाव्याला CRP, बँकसखी, FLCRP, कृषी, पशू सखी, ग्राम संघ, प्रभाग संघ पदाधिकारी व गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.