वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व प्रकल्प प्रेरणा, जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद अंतर्गत लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी (दि. १४) मोफत ताणतणाव निवारण व सर्वरोग निदान आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरासाठी उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयातील मनोविकार तज्ञ डॉ. महेश कानडे, राजेश नरवाडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी (दि. १४) सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत हे मोफत ताणतणाव निवारण व सर्वरोग निदान आरोग्य शिबीर होणार आहे. या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर ढोले व कानेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका बंदीछोडे यांनी केले आहे.