कुटुंबप्रमुख या नात्याने शिक्षक बांधवाचे प्रश्न सोडवणार असे प्रतिपादन नूतन गटशिक्षणाधिकारी असरार सय्यद यांनी केले. लोहारा येथे शुक्रवारी (दि.४) त्यांचा शिक्षकांनी सत्कार केला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
लोहारा तालुक्याचे नूतन गटशिक्षणाधिकारी सय्यद असरार यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ लोहारा यांच्या वतीने यथोचित स्वागत सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सत्काराला उत्तर देताना सय्यद यांनी लोहारा तालुक्यातील शिक्षक बांधवांचे प्रश्न कुटुंबप्रमुख म्हणुन सोडवणार, कुणाचीही कामे अडणार नाहीत. कसल्याच प्रकारचा भेद न करता सर्वांना सोबत घेऊन तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी सर्वांनी शैक्षणिक क्षेत्रात झोकून देऊन काम करून तालुक्याचा नाव लौकीक वाढवावा असे अवाहन केले. तसेच यावेळी उपस्थित केंद्रप्रमुख बापू शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष सुदर्शन जावळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. बापु शिंदे, सुर्यकांत पांढरे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कार्यालयीन विस्तार अधिकारी भास्कर बेशकराव, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी गुणवंत वाघमोडे, तालुकाध्यक्ष सुदर्शन जावळे, केंद्रप्रमुख गजानन मक्तेदार, केंद्रप्रमुख मोहन शेवाळे, नयन शेख, केंद्रीय मुख्याध्यापक मधुकर चंदनशिवे, संघाचे जिल्हा नेते व्यंकट पोतदार, संघाचे नेते संजय माशाळकर, तानवडे सर, कवाळे सर, शिक्षक पतसंस्था संचालक जीवन गायकवाड, सुर्यकांत पांढरे, मच्छिंद्र बोकडे, सुधीर घोडके, माजी सचिव प्रवीण शिंदे, प्रवीण कदम, नितीन वाघमारे, रसूल शेख, रफिक शेख, राहुल भेडे, मनोरथ भोजने, काठमोडे सर , अवधूते सर, बाळासाहेब कदम, तावरे मामा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकट पोतदार यांनी केले.