वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथे मंगळवारी (दि.२५ ) शेतीशाळा घेण्यात आली. यानिमित्त शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक सचिन पवार यांनी फवारणी सुरक्षा किट वाटप करून फवारणी बद्दल सविस्तर माहिती दिली. माती परीक्षणानुसार खताची मात्रा कसा द्यावा याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहु, करडई पिकाचे रोग व किड व्यवस्थापन कसे करावे व उन्हाळी सोयाबीन पेरणी याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. गावातील शेतकरी सिद्राम तडकले, ॲड. सयाजी शिंदे यांनी उन्हाळी सोयाबीन पेरणी केली व शेतकऱ्यांना नवीन नवीन प्रयोग करून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मोलाची माहिती सांगितली. तसेच कृषी सहाय्यक यांनी महाडीबीटी अंतर्गत विविध योजना, एमआरईजीएस अंतर्गत फळबाग, गांडूळ, नॅडेप, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME ) इ. योजनांमध्ये शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करावे असे आवाहन केले. यावेळी प्रगतशील शेतकरी सिद्राम तडकले, अॅड. सयाजी शिंदे, तुकाराम (दादा) चौधरी, चेअरमन नरसप्पा शिदोरे, प्रदीप बलसुरे, अजिंक्य तडकले, शम्मु खैराटे, कृषी मित्र बालाजी सुरवसे व इतर शेतकरी उपस्थित होते.