वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
पंचायत समिती लोहारा येथे कोरोनामुक्त गाव पुरस्काराबाबत तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यासाठी शुक्रवारी (दि.१) बैठक घेण्यात आली.
लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली.
ही समिती ग्रामपंचायत पथकांनी कोविड-१९ व्यवस्थापनाद्वारे गावाला कोरोनामुक्त करण्यासाठी केलेल्या कामाचे मूल्यांकन करून पुरस्कारासाठी ग्रामपंचायतींचा प्रस्ताव जिल्हा स्तरावर सादर करण्यासाठी गठीत करण्यात आलेली आहे. सदर मूल्यमापनाद्वारे लोहारा तालुक्यातून सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या दहा ग्रामपंचायतींचे प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात येणार आहेत.
या बैठकीस सर्व सदस्य बाल विकास प्रकल्प अधिकारी ए.बी. कांबळे, लोहारा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोविंद साठे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी बी. एस. बेशकराव, समितीचे सदस्य सचिव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे उपस्थित होते होते.