Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

क्षयरोग रुग्णांना स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचा मानवतावादी हात – ७६ रुग्णांना संपूर्ण उपचार होईपर्यंत सकस आहार वाटप..

admin by admin
03/11/2022
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

लोहारा:
प्रधानमंत्री टी. बी. मुक्त अभियान अंतर्गत टी.बी.चे संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी मोफत उपचार केला जातो. या उपचारा सोबत रुग्णांना सकस मोफत आहारासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन अशा रुग्णांना किमान सहा महिने दत्तक घेऊन त्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून सकस आहार पुरविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी केले.
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रफिक अन्सारी यांनी संबंधित बैठक घेऊन जिल्ह्यातील सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांना यामध्ये पुढाकार घेण्याचे अपिल केले. त्यांच्या या आवाहनास प्रतिसाद देत ग्रामीण रुग्णालय सास्तूर (स्पर्श) तर्फे लोहारा तालुक्यातील क्षयरोग उपचार चालू असलेल्या 76 रुग्णांना त्यांचा उपचार संपेपर्यंत (सहा महिने) त्यांच्या उदरनिर्वाहासाठी, सकस आहारासाठी अन्नधान्याचे वाटप करण्यासाठी दत्तक घेतले आहे. दि. 2 ऑक्टोबर 2022 रोजी ग्रामीण रुग्णालय सास्तुर च्या सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवकुमार हलगुडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रफिक अन्सारी यांच्या हस्ते या रुग्णांना या महिन्यासाठी अन्नधान्य वाटप करण्यात आले. यात गहूआटा, तांदूळ, तूरडाळ, मूगडाळ, शेंगदाणे, गोड तेल व अंगाचे साबण इ. वाटप करण्यात आले. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वात जास्त 76 रुग्णांना स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तुरच्या वतीने आहार वाटपासाठी रुग्णांना दत्तक घेतल्यामुळे स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे व प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी अभिनंदन केले व ग्रामीण रुग्णालय स्पर्श सास्तुरचा हा मानवतावादी दृष्टिकोन समाजातील इतर नागरिकांनी आत्मसात करावा व क्षयरोग निर्मूलनासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.


या कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉ. सुशील चव्हाण, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. के.के. मिटकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्षयरोग कार्यालय उस्मानाबादचे जिल्हा पर्यवेक्षक श्री. शरदकुमार बोने, तालुका पर्यवेक्षक श्री ज्ञानेश्वर बिराजदार, श्री नागेश ढगे यांनी विशेष परिश्रम व सहकार्य केले.


या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल प्रकल्प अधिकारी श्री रमाकांत जोशी यांनी सर्व मान्यवर, रुग्ण यांचे आभार व्यक्त केले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: स्पर्श रुग्णालय सास्तुर
Previous Post

अवैध गुटखा वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल – 23 लाख 10 हजार रुपयांचा गुटखा केला जप्त

Next Post

लोहारा नगरपंचायतच्या वतीने राष्ट्रीय एकता दौड

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

लोहारा नगरपंचायतच्या वतीने राष्ट्रीय एकता दौड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's