वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
गुजरात विधानसभा निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी (दि.3) गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, विधानसभेच्या एकूण 182 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे.
गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी 1 डिसेंबरला, तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी 5 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. दोन्ही टप्प्याची मतमोजणी 8 डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकीला 4.9 कोटी मतदार मतदान करतील. गुजरातमधील एकूण 51,782 मतदान केंद्रे असून, महिलांसाठी 1274 मतदान केंद्रे आहेक. दिव्यांगासाठी खास 182 मतदान केंद्र, तर 142 आदर्श मतदान केंद्र आहे.
🔴 निवडणूक कार्यक्रम खालीलप्रमाणे –
पहिला टप्पा
5 नोव्हेंबर – अधिसूचना जारी होणार
14 नोव्हेबर – अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
15 नोव्हेंबर – अर्जांची छाननी
17 नोव्हेंबर – अर्ज मागे घेण्याची मुदत
1 डिसेंबर – मतदान
🔴 दुसरा टप्पा
10 नोव्हेंबर – अधिसूचना जारी होणार
17 नोव्हेबर – अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
18 नोव्हेंबर – अर्जांची छाननी
21 नोव्हेंबर – अर्ज मागे घेण्याची मुदत
5 डिसेंबर – मतदान
🔴 मतमोजणी : 8 डिसेंबर