वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामपंचायतीच्या गोडाऊनमधून चोरीस गेलेल्या विद्युत पंप, वाॕल व केबल या साहित्याची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी अशी मागणी माकणी येथील शुभम साठे यांनी पोलिस अधिक्षकांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, माकणी येथील ग्रामपंचायतच्या गोडाऊनमध्ये ठेवलेले ४१ एच.पी. के.एस.बी सबमर्सिबल पंप, दोन बोअर पंप, सहा इंची वाॕल एक नग, पाच इंची वाॕल एक नग, चार इंची वाॕल एक नग असे साहित्य १८ संप्टेबर २०२२ रोजी सकाळी दहा वाजता चोरीस गेल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच मागील काही दिवसात २२ खेडी पाणीपुरवठा फिल्टरच्या गोडाऊनमधून सातशे मिटर १० एम.एम. केबल वायर, दोनशे मिटर १२ एम.एम. केबल वायर चोरीस गेलेले आहे. हा चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर माकणीच्या सरपंचांनी यांनी सास्तुर दुरक्षेत्रच्या बिट अंमलदारांकडे १८ सप्टेंबर रोजीच याबाबतची तक्रार दिली. तक्रार देऊन दोन महिने झाले तरी अद्याप तपास झाला नाही. हा गाव पातळीवर महत्वाचा सार्वजनिक विषय असल्याने या प्रकरणी स्वतः पोलिस अधिक्षक साहेबांनी लक्ष देवून वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत या घटनेचा छडा लावावा अशी मागणी या निवेदनात केली आहे.