वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित स्वयं सहाय्यता समूहांना आर्थिक सक्षम करून गटातील महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न वाढ करण्याच्या उद्देशाने बँक कर्जाचा पुरवठा करण्यात येतो.
8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद लातूर येथे बँक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हातील एकूण ३३४ गटांना ७ कोटी ८१ लाख रक्कमेचे कर्ज बँकेच्यावतीने वितरण करण्यात आले. प्राप्त कर्जाच्या माध्यमातून महिलांनी आपल्या उत्पादनाची आकर्षक पॅकेजिंग, लेब्लिंग करून कायमस्वरूपी उद्योगाची निर्मिती करावी, आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष निमित्ताने गटातील महिलांनी भरड धान्यपासून विविध पदार्थांची निर्मिती करावी. यासाठी सर्व बँकेने CMEGP, PMEGP, PMFME इत्यादी शासकीय योजनांचे यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी कृतिसंगंमच्या माध्यमातून कर्ज वितरण करण्यासाठी सर्व बँकेला आवाहन केले. तसेच बचत गटातील सर्व महिलांनी गावविकासात सहभाग घेऊन महत्त्वाची भूमिका पार पाडावी असे सर्व उपस्थीत महिलांना यावेळी मार्गर्शन करून आवाहन केले.
यावेळी शासनाच्या लिंग समभाव जाणीव जागृती चित्र रथाचा शुभारंभ झेंडा दाखवून मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल व प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उत्कृष्ठ बँक सखीचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी हर घर नर्सरी या उपक्रमाचा डेमो प्लॉटच्या माध्यमातून महीलांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बिया लावून शुभारंभ करण्यात आला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत ) दत्तात्रय गिरी यांनी उपस्थित महिलांना ग्रामीण भागतील महिलांनी नर्सरीची निर्मिती करून पर्यावरण संवर्धनांस हातभार लावावा असे आवाहन केले.
यावेळी प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर यांनी उपस्थित महिलांना महिला दिनानिमत्ताने शुभेच्छ दिल्या. यावेळी LDM अनंत कसबे यांचा सेवानिृत्तीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी मेळाव्यास स्टेट बँक ऑफ इंडिया चीफ मॅनेजर भास्कर मनी व बँक ऑफ महााष्ट्र चीफ मॅनेजर जोशी उपस्थित होते. या बँक मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा व्यवस्थपक अनिता माने व सूत्र संचालन शीतल जगताप यांनी केले. या मेळाव्यासाठी सर्व तालुका अभियान व्यवस्थापक बँक सखी,सर्व प्रभाग समन्वयक, सर्व तालुका व्यवस्थापक हे उपस्थित होते.या मेळाव्याचे यशस्वी नियोजन जिल्हा व्यवस्थापक भगवान कोरे, पांडुरंग जेटणुरे व वैभव गुराले यांनी केले.