वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
दि. 16 ते 18 जानेवारी 2023 या कालावधीत महात्मा बसवेश्वर विद्यालय जेवळी येथे तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. यात लोहारा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या मुलांच्या संघाने कबड्डी या खेळात तालुक्यात प्रथम आला. तर खो-खो स्पर्धेमध्ये मुलींचा संघ तालुक्यात प्रथम आला. तसेच कुस्तीमध्ये दोन मुलींची जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली. वैयक्तिक योगासना स्पर्धेमध्ये एका मुलाची जिल्हास्तरीय निवड झाली. यासाठी शाळेतील शिक्षक सुरेश साळूंके, बालाजी यादव, अतुल भड, प्रवीण शिंदे, अमोल जट्टे यांनी स्पर्धेची तयारी करून घेतली. शाळेचे मुख्याध्यापक मधुकर रोडगे यांनी मार्गदर्शन केले. शाळेतील इतर सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.