वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांची अलिबाग येथे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी या पदावर पदोन्नती झाली आहे. त्यानिमित्त शनिवारी (दि.६) लोहारा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे हे लोहारा येथील कार्यालयात २०१८ मध्ये रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आदी ठिकाणी असलेल्या आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न केले. कोविड १९ च्या काळात तर स्वतः ग्राउंड वर उतरून सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना धीर देत त्यांच्याकडून काम करून घेतले. एकंदरीत आरोग्य क्षेत्रातील एक हुशार व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख तालुक्यात निर्माण झाली होती. मागील काही दिवसांपूर्वी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांची अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी या पदावर पदोन्नती झाली आहे. त्यानिमित्त लोहारा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात त्यांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर ढोले, लोहारा ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. गोविंद साठे, तुकाराम कटारे, पुष्पा कटारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कर्मचाऱ्यांनी डॉ. कटारे यांच्याबद्दल आलेले अनुभव विशद करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. कटारे यांनीही मनोगत व्यक्त केले. ज्या पद्धतीने मागील चार वर्ष आपण मला सहकार्य करून आपला तालुका अव्वल ठेवण्यात पुढाकार घेतला. त्याच प्रमाणे यापुढील काळातही आपण सर्वांनी काम करावे असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी कानेगाव प्रा. आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका बंदीछोडे, जेवळीच्या डॉ. पूजा चिंचोलीकर, बालाजी साळुंके, एस. एन. शिंदे, किशोर डोईजोडे, दादाराव इंगळे, अजय रणखांब, महादेव चांदणे, जाधव सिस्टर, सतीश गिरी, अरुण सारंग, नीलकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, वर्षा इंगळे, एस. पी. भालेराव, खंडू वाघमारे, डी. बी. बिराजदार, एम. पी. चांदणे, एम. एस. देशमुख, शकीला गवंडी, कविता रसाळ, पार्वती सरवदे, व्ही. एम. घोडके यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.