वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील तमाम युवकांचे प्रेरणास्थान मा. श्री. दिपकभैय्या अशोकराव जवळगे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळकरी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी, स्पर्धा परीक्षांची तयारी येथूनच सुरु व्हावी व आपल्या तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी भविष्यात अधिकारी बनावेत या प्रामाणिक हेतूने भव्य तालुकास्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील इ. 5 वी ते इ. 10 वी मध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
लहान गट
इ. 5 वी ते इ.7 वी
प्रथम पारितोषिक – रु. 5000/- व चषक
द्वितीय पारितोषिक – रु. 3000/- व चषक
तृतीय पारितोषिक – रु. 2000/- व चषक
चतुर्थ पारितोषिक – रु. 1000/- व चषक
पाचवे पारितोषिक – रु. 1000/- व चषक
मोठा गट
इ. 8 वी ते इ.10 वी
प्रथम पारितोषिक – रु. 5000/- व चषक
द्वितीय पारितोषिक – रु. 3000/- व चषक
तृतीय पारितोषिक – रु. 2000/- व चषक
चतुर्थ पारितोषिक – रु. 1000/- व चषक
पाचवे पारितोषिक – रु. 1000/- व चषक
स्पर्धेचे नियम व अटी
ही स्पर्धा लेखी बहुपर्यायी स्वरूपाचे असेल
ही स्पर्धा लेखी स्वरुपाची असेल.
गणित, बुध्दिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण व चालू घडामोडी यावर एकूण 50 प्रश्न असतील व गुण 100 असतील.
स्पर्धेची प्रवेश फी 20/- रु. असेल.
दोन्ही गटाची प्रश्नपत्रिका वेगळी असेल.
ही स्पर्धा दिनांक 22-01-2023 वार रविवार रोजी सकाळी ठीक 09 वा. खालील परीक्षा केंद्रावर ठेवण्यात आली आहे.
१. कै. वसंतराव काळे माध्यमिक विद्यालय, लोहारा
२. राजीव गांधी विद्यालय, खेड
३. शरद पवार विद्यालय, राजेगाव.
४. राजाराम बापू विद्यालय, कास्ती.
नाव नोंदणी अंतिम दिनांक 20-01-2023
टीप – एखाद्या शाळेमधील परीक्षार्थीची संख्या 100 पेक्षा जास्त असेल तर तेथे परीक्षा केंद्र दिले जाईल.
आयोजक – कै. वसंतराव काळे माध्य. विद्यालय, लोहरा
श्री पंडित खराडे सर मो. 9096061278, श्री समाधान मोरे सर मो. 9637335464