वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेत लोहारा तालुका विधी सेवा समितीच्या वतीने सोमवारी (दि. १४) बालदिनाचे औचित्य साधून सशक्तीकरण व संपर्क अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लोहारा येथील न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश एन.एस.सराफ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त दिवाणी न्यायाधीश एन.एस.सराफ यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश एस.एस.कळसकर, तालुका विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. महेश जट्टे, ॲड. डी.एम जानकर, ॲड.बी.बी. ढेकणे, ॲड. ए.ए.कुलकर्णी, ॲड. एम.एस. वचने, न्यायालयीन कर्मचारी सी.के. कदम, एस.पी.कुलकर्णी, डी.एस.वाघमारे, एस डब्ल्यू. गायकवाड एस. व्ही.भोसले ,एस. जी.कांबळे, पी.एस.पवार, योगेश वाघमारे यांच्यासह सास्तूर येथील सामाजिक कार्यकर्ते महेश स्वामी, प्रशालेचे मुख्याध्यापक बी.टी.नादरगे, प्राचार्य बी.एम.बालवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
दिव्यांग विद्यार्थ्यानी खचून न जाता शिक्षण घेवून सक्षम व्हावे. शिक्षणाच्या माध्यमातून दिव्यांगानी आदर्श नागरीक होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी सास्तुर निवासी दिव्यांग शाळेच्या माध्यमातून चांगले कार्य होत आहे असे उदगार याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना लोहारा दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश एन.एस सराफ यांनी काढले.
‘बालदिनाच्या निमित्ताने प्रशालेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साधने तसेच बेडसीटसचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसांडून वाहत होता.
या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचे पालक तसेच शाळेतील शिक्षक अंजली चलवाड, राजकुमार गुंडुरे, राम बेंबडे, रमाकांत इरलापल्ले, यास्मिन शेख, संध्या गुंजारे, प्रवीण वाघमोडे, महेश काळे, मंगेश कुलकर्णी, विठ्ठल शेळगे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोरख पालमपल्ले, ज्ञानोबा माने, निवृत्ती सूर्यवंशी, संभाजी गोपे, दगडु सगर, कविता भंडारे, संजय शिंदे, निशांत सावंत, माधव मुंडकर, सुरेखा परीट, किरण मैदर्गी, सुनीता कज्जेवाड, सूर्यकांत कोरे आदींनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बी. टी. नादरगे यांनी केले. प्रवीण वाघमोडे यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले.