लोहारा / सुमित झिंगाडे
लोहारा तालुक्यातील नागुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील कुमारी भक्ती पवनकुमार चंदनशिवे, प्रणिता उत्तम पाटील, कृष्णा अप्पाराव मसलकर हे तीन विद्यार्थी पात्र झाले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी डी.जी. दंडगुले, एस. एस. सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेऊन मार्गदर्शन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक भोसले सर, साळुंखे सर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. १०) शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोविंद पाटील, उपाध्यक्ष अकबर तांबोळी, सदस्य जाफर दाळींबकर, असिफ दाळींबकर, संतोष चंदनशिवे, संजय सोनवणे, अप्पाराव पांढरे, सुधाकर मुळे, बनसोडे सर यांच्यासह शिक्षक, पालक विद्यार्थी उपस्थित होते. या यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.





