वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील नागूर येथील राजमाता प्री प्रायमरी स्कूल मध्ये गुरुवारी (दि.१२) राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नर्सरी क्लास मधील नित्या दुधभाते, एलकेजी क्लास मधील साची चव्हाण, युकेजी क्लास मधील श्रावणी चव्हाण, समर्थ पाटील, शौर्य मोरे, वेद चव्हाण, भक्ती हजारे आदी विद्यार्थ्यांनी जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या वेषभुषेत मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक तानाजी पाटील, सहशिक्षक अमोल पाटील, स्वाती निकम, गोकर्णा भांडे यांच्यासह कर्मचारी विजया परितेकर, ज्ञानेश्वर सोनवणे आदी उपस्थित होते. याप्रसंगी जिजाऊंच्या व विवेकानंदांच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.