वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील उमेद बचत गटांच्या विविध व्यवसायांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक संतोष जोशी यांनी बुधवारी (दि.२३) भेट दिली. तगरखेडा येथे उमेद अंतर्गत सुरू असलेल्या एलईडी बल्ब व्यवसायास भेट देऊन व्यवसायिक महिलांशी चर्चा करून या व्यवसायाचे कौतुक केले व या व्यवसाय वृद्धीसाठी नाविन्यपूर्ण योजनेतून मदत करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. तसेच जयभारत समूहातील महिलेने सुरू केलेल्या उपहार गृहाचे उदघाटन प्रकल्प संचालक व गट विकास अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सुकन्या महिला ग्रामसंघास भेट देऊन महिलांना एक महिला एक झाड लावून वृक्षरोपण करावे याबाबत प्रकल्प संचालक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी सुंदर माझे गाव उपक्रमात गावाची निवड करण्यात येणार असून बचतगट महिलांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम यशस्वी करावा तसेच गटाच्या मार्फत नर्सरी सुरू करण्यात यावी याबाबत माहिती दिली. उमेद अंतर्गत सुरू केलेल्या तिरुपती भाजीपाला मार्टला भेट देऊन व्यवसायिक महिलांना प्रोत्साहित केले. याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण केले. तसेच गावातील विविध विकास कामास प्रकल्प संचालक यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रभाग समन्वयक त्रिंबक लहाने हे उपस्थित होते. या भेटीचे यशस्वी नियोजन सीआरपी मुमताज शेख व ग्रामसंघ पदाधिकारी महीला यांनी केले.