लोहारा / सुमित झिंगाडे
लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयामधील 11वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी धम्मदीप कांबळे याने 51किलो वजन गटात,17वर्ष वयोगट, ग्रीको रोमन कुस्ती मध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल प्राचार्या श्रीमती उर्मिला पाटील यांनी धम्मदीप चा सत्कार करून अभिनंदन केले.या स्पर्धा क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने तुजाभवानी स्टेडियम उस्मानाबाद याठिकाणी घेण्यात आल्या होत्या.
विभागीय कुस्ती स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल लातूर याठिकाणी 2 जानेवारी 2023 रोजी होणार आहेत. धम्मदीप चा सत्कार करताना इतर विद्यार्थ्यांनी या यशतून प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन प्राचार्या श्रीमती उर्मिला पाटील केले. धम्मदीप 17 वर्ष वयोगटात,51 किलो वजन गट ग्रीको रोमन कुस्ती मध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. भारतीय राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिव डॉ शेषेराव जावळे पाटील यांनी धम्मदिपचे अभिनंदन करून विभागीय कुस्तीसाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी जिल्हा क्रीडा धिकारी उस्मानाबाद श्रीकांत हरनाळे क्रीडाधिकारी सारिका काळे, क्रीडा धिकारी कैलास लटके, क्रीडाधिकारी नदीम शेख यांनी धम्मदिपला विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या धम्मदिपला क्रीडा विभाग प्रमुख प्रा प्रशांत काळे व श्री नागनाथ पांढरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी लोहारा तालुका क्रीडा संयोजन समिती अध्यक्ष गोपाळ सुतार व सचिव मुकेश सोमवंशी यांनी धम्मदिपला विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी प्रा विठ्ठल कुन्हाळे, प्रा सचिन शिंदे, प्रा विद्यासागर बुवा, प्रा सुनिल बहिरे प्रा ज्ञानदेव शिंदे, दत्ताजी जावळे पाटील प्रा उद्धव सोमवंशी, प्रा राजेशा अष्टेकर, प्रा राजेंद्र साळुंके, प्रा नारायण आनंदगावकर, प्रा रामचंद्र खुणे, प्रा गणेश कांबळे, प्रा लक्ष्मीकांत कुलकर्णीअंकुश शिंदे, काकासाहेब आनंदगावकर, प्रा विषनुदास कलमे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी धम्मदिपचे अभिनंदन केले आहे.