वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील पत्रकार बालाजी बिराजदार यांना स्मृतिशेष रामलिंगप्पा वैरागकर सामाजिक प्रतिष्ठानकडून देण्यात येणारा महात्मा ज्योतिबा फुले स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन शनिवारी (दि.१८) उमरगा येथे आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
उमरगा येथे शनिवारी (दि.१८) आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरगा येथील ज्येष्ठ उद्योजक शिवशंकर माळगे हे होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. सोमनाथ रोडे, डॉ. दामोदर पतंगे, उमरगा येथील श्रमजीवी शिक्षण संस्थेचे संचालक शिवमूर्ती भांडेकर, लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्मृतिशेष रामलिंगप्पा वैरागकर सामाजिक प्रतिष्ठान मागील दोन वर्षापासून महात्मा जोतिबा फुले स्मृती पुरस्कार देवून विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव करण्यात येत आहे. यावर्षीच्या स्मृतिशेष स्मृती पुरस्कारांची घोषणा महात्मा जोतिबा फुले स्मृतिदिनानिमित्त करण्यात आली होती. लोहारा येथील पत्रकार बालाजी बिराजदार यांना महात्मा ज्योतिबा फुले स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला होता. या कार्यक्रमात बालाजी बिराजदार यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी उमरगा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष सिद्रामप्पा चिंचोळे, विद्यमान अध्यक्ष रणधीर पवार, कार्याध्यक्ष नितीन होळे, किरण सगर, युवासेना लोहारा तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव पत्रकार निळकंठ कांबळे, गिरीश भगत यांच्यासह विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष वैरागकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रविण स्वामी यांनी केले.