वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
पाइपलाइन इन्फस्टकचर लिमिटेड व बायफ संस्था यांच्या विद्यमाने लोहारा तालुक्यातील भातागळी, कास्ती बु व नागुर गावातील विधवा, अपंग व गरजूंना मंगळवारी (दि.३१) रेशन किट, सॅनिटायझर, ऑक्सिमिटर, थर्मामिटर, मास्कचे वाटप करण्यात आले.
कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेत गरजू विधवा, अपंगांना मदत म्हणून या किटचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी पि.आय. एल. अधिकारी पवनकुमार देशमुख, संजय जहागीरदार, बायफचे वरिष्ठ प्रोग्राम मॅनेजर अमित दलाल, डॉ. कृष्णा जाधव,डॉ. अतुल मुळे आदींच्या हस्ते तालुक्यातील भातागळी, कास्ती व नागुर गावात या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी भातागळी चे सरपंच दत्ता हजारे, उपसरपंच हणमंत जगताप, कास्तीचे सरपंच अखिल तांबोळी, नागुरचे सरपंच गजेंद्र जावळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी भातागळी आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी थोरात व गायकवाड यांनी कोविड १९ बद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी अपंग, विधवा, गरजूंना रेशन किटचे तर गावातील आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, शिक्षक, ग्रामस्थांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. पीआयएल कंपनीकडून करण्यात आलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. यावेळी बायफ संस्थेचे स्टाफ रत्नजीत मडके, सुधाकर बागल, शितेश तांबवे, गणेश मुळे, ज्ञानेश्वर साबळे, मनीषा पाटील यांच्यासह आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, शाळेतील सर्व शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.