लोहारा येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी जयसिंग बंडगर तर उपाध्यक्षपदी प्रेम लांडगे यांची निवड करण्यात आली आहे.
लोहारा येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या कार्यकारिणी निवडण्यासाठी लोहारा येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी जयसिंग बंडगर तर उपाध्यक्षपदी प्रेम लांडगे, राहुल विरोधे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सचिवपदी प्रशांत थोरात, कोषाध्यक्ष श्रीकांत तिगाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी डॉ. हेमंत श्रीगिरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी बलभीम विरोधे, सुधीर घोडके, दगडू तिगाडे, अंकुश बंडगर, विकास घोडके, रघुवीर घोडके, अक्षय विरोधे, विकास पांढरे, गोपाळ घोडके, महेश वाघे, अक्षय वाघे, अंगद बंडगर, प्रदीप घोडके, अजित घोडके, रमेश बंडगर, गोरख घोडके, वैभव घोडके, राम सुरवसे, अनिल विरोधे, अमोल बंडगर, हर्षद बंडगर, धवल खताळ, अमित महानुर, नितीन वाघे, रोहित विरोधे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.