लोहारा तालुक्यातील बेलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आषाढी एकादशी निमित्त बुधवारी (दि.२८) दिंडी काढण्यात आली. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी व गावातील भजनी मंडळातील लोकांनी अभंग आरती व गीत गायन केले.
याप्रसंगी गावातील भजनी मंडळी दगडू जाधव, शिवाजी छत्रे, तुकाराम शिंदे, बिभीषण जाधव, राजकुमार शिंदे इत्यादी भजनी मंडळी उपस्थित होते. ग्रामस्थांनी या दिंडीला चांगला प्रतिसाद दिला. यावेळी गावातील महिला मंडळांनी दिंडीची आरती करून स्वागत केले. गावातील सर्व लोकांनी दिंडीची कौतुक केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर सूर्यवंशी, शिक्षक अनंत कानेगावकर, खिजर मोरवे, मल्लिकार्जुन कलशेट्टी, सुनंदा निर्मळे, छाया जाधव आदी उपस्थित होते.