लोहारा :
लोहारा शहरातील भटक्या विमुक्त जातीच्या पालावरील ३० कुटूंबीयांना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांच्याकडून दिवाळीनिमित्त फराळाचे साहीत्य व साड्याचे वाटप करण्यात आले. सोमवारी (दि. २४) हे वाटप करण्यात आले आहे.
वर्षातील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळी सणानिमित्त हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. दिवाळी सण सर्व स्तरातील लोकांकडून आपापल्या परीने साजरा केला जातो. परंतु लोहारा शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागील जागेवर भटक्या विमुक्त जातीच्या पालावर ३० कुटुंब राहतात. त्यांचीही दिवाळी गोड व्हावी या उदात्त हेतूने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांनी सोमवारी (दि. २४) भटक्या विमुक्त जातीच्या पालावरील ३० कुटूंबीयांना फराळाचे साहीत्य व साड्याचे वाटप केले. हा स्तुत्य उपक्रम राबवून आमची दिवाळी गोड केल्याबद्दल त्या कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले.
यावेळी युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार, माजी उपनगरध्यक्ष प्रताप घोडके, माजी ग्रामपंचायत सदस्य महेबूब गवंडी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भगत, रघुवीर घोडके, भगवान मक्तेदार, राजकुमार स्वामी, किरण पाटील, कमलाकर मुळे, शितल खुणे, विशाल झिंगाडे, प्रेम लांडगे, अमर महानुर, अविनाश रसाळ, अनिल यल्लोरे, इस्माईल शेख, आण्णा मुळे, ओमकार बिराजदार, शिवकुमार बिराजदार यांच्यासह नागरिक उपस्थित होते.