वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील भोसगा येथील ज्योती बसवंत हत्तरगे यांना राजस्थान येथील विद्यापिठाच्या वतीने जेजेटी द स्टडी ऑफ बायो डायव्हर्सिटी ऍट अचलेर वॉटर टँक इन उस्मानाबाद महाराष्ट्र या विषयावर डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली आहे. याबद्दल लोहारा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, पंचायत समिती सदस्य वामन डावरे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, काशीनाथ घोडके, महादेव कोरे, बसवराज कोंडे, दादा वडगावे, व्यंकटेश कागे, जयेश सुर्यवंशी यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.






