वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील भातागळी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बाळासाहेब जगताप तर व्हाईस चेअरमनपदी सत्यवान पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालकांचा सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील भातागळी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली होती. बुधवारी (दि. ८) सोसायटीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीसाठी संचालकांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. एन. विभुते होते. यावेळी चेअरमन पदासाठी बाळासाहेब यशवंत जगताप तर व्हाईस चेअरमन पदासाठी सत्यवान महादेव पाटील यांचा अर्ज दाखल झाला. चेअरमन, व्हाईस चेअरमन पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून धनराज जाधव यांनी काम पाहिले. निवडीनंतर नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालकांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव धनंजय जाधव, लिपिक महारुद्र वकील, संचालक माधव श्रीरंग जगताप, बाबासाहेब भातागळीकर, शहाजी कदम, धनराज वाले, रमेश ओवांडकर, बालाजी आनंदगावकर, मुकूंद चव्हाण, विठ्ठल चव्हाण, शालूबाई जगताप, अरुणा जगताप यांच्यासह अमोल ओवांडकर, उत्तम जगताप, विजयबापू जगताप, तानाजी आनंदगावकर, प्रविण पाटील, फुलचंद जगताप, जनार्धन कांबळे, संग्राम जगताप, मुकूंद जगताप, शरद चव्हाण, अविनाश पाटील, अविनाश कदम, चंद्रहर्ष जगताप आदी उपस्थित होते.